अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १५ ट्रॅक व 1 कार जप्त

सुनील हिंगे ( अल्लिपुर )
हिंगणघाट तालुक्यातील शिरसगाव अल्लीपुर रस्त्यावरील पवनी गावाजवळ जवळ पुलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तब्बल १५ ट्रॅक व 1 कारवर कारवाई करीत जवळपास ३ करोड ४० लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून १६ आरोपींना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार पुलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांना शिरसगाव अल्लीपुर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पथकाने २१ मार्चला पहाटे ४ वाजताच्या सुमारास पवनी जवळ कारवाई करून सर्व वाहने अल्लिपुर पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आला.या मोठ्या कारवाईमुळे वाळू चोरट्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
वाहने केली जप्त या कारवाईत
पोलीसांनी एम. एच.३५ के ५३२७ , एम एच ३१ सी क्यू ३१७४, एम एच ३२ एजे ३१६१, एम एच ४० वाय २०७५, एम एच ३२ एजे ४२८३, एम एच ४०बीएफ ३२८४, एम एच ३१ डीएस ४२६४, एम एच ३१सीबी८८९८, एम एच ४०वाय ९६९५, एम एच ३४एम ५९७९, एम एच ३२ एजे ५१४१, एम एच ४०एन ७६३१, एम एच ४० एन५४४४, एम एच ४० एन७२८६, एम एच २९ बीई ७९८२, एम एच ०३ बीई २७९८, या ट्रॅक व टीप्पर सह एम एच ४३एआर ५३८१क्रमांकाची कार जप्त करण्यात आली.